यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पश्चात त्यांच्या कृतीशील विचारांचा वारसा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि सहकारी, चव्हाण सेंटरच्या माध्यमातून जोपासत आहेत. आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे ही दृष्टी डोळ्यासमोर ठेऊन युवा, शिक्षण, महिला, आरोग्य, दिव्यांग व ज्येष्ठ नागरिक आणि सांस्कृतिक क्षेत्रांमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडत आहे.
यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सर्व विभागांच्या कार्याचा आढावा घेणारे “यशवंत संवाद” हे मॅगझिन दर दोन महिन्यांनी ई वार्तापत्राच्या म्हणजेच डिजिटल स्वरूपात वाचकांसाठी उपलब्ध होते. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खा. सुप्रिया सुळे या मॅगझिनच्या मानद संपादक आहेत. चव्हाण सेंटरच्या वेबसाईटवर देखील हे मॅगझिन वाचण्यासाठी उपलब्ध आहे.